जळगाव प्रतिनिधी । लोहारा येथून एकुलती येथे मित्रासह जात असतांना 10 जून रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला होता. जखमी तरूणास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता आज सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, शुभम श्रीराम देशमुख वय-23 आणि अनिल प्रभाकर देशमुख वय-25 हे दोघे रा. लोहारा ता.पाचोरा सायंकाळी खासगी कामानिमित्त सोमवारी 10 जून रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास दुचाकीने एकुलतीकडे जात असतांना दुचाकी झाडाला आदळल्याने शुभम गंभीर जखमी झाला तर अनिल देशमुख किरकोळ जखमी झाला. शुभमला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज सोमवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभम हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडीलांचे आगोदर निधन झाले होते. त्याच्या पश्चात विधवा आई आणि विवाहित बहिण असा परीवार आहे. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.