पहूर, ता. जामनेर रविंद्र लाठे । बदलत्या काळानुसार सोशल मीडियाद्वारे पाठविलेल्या लग्नपत्रीका स्वीकारण्याची गरज असल्याचा विषय घेऊन येथील कलावंत लग्नपत्रीका हा लघुपट तयार करत आहेत.
पुर्वी प्रत्यक्षात तसेच टपालाने पाठविलेल्या पत्रिका आपण स्विकारायचो. मात्र सोशल मिडीयाच्या जगात वावरत असताना व्हॉट्स अॅप ,फेसबुकद्वारे लग्नपत्रिका स्विकारल्या जात नाही जात नाही ? या गंभीर विषयावर ज्याचा कुठेतरी खरंच विचार व्हायला पाहिजे, असा हा विषय सोप्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न तरुण कलाकार करीत आहेत. ग्रामीण तरूणांसाठी युट्युबचे एक सशक्त माध्यम खुले झाले आहे. याद्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. या अनुषंगाने पहूर येथील कलाकार ऋषिकेश चौधरी हा तरुण सध्यस्थीतीवर आधारित प्रत्येकाच्या काळजाला भिडणारी अतिशय हृदयस्पर्शी अशा लघुपटाची निर्मिती करत आहे. लग्नपत्रिका या लघुचित्रपटाद्वारे त्याने समाजातील एक संवेदनशील विषयाला हात घातला आहे. याची. संकल्पना कृष्णा जोशी यांची आहे. तर सध्या सर्वत्र धमाल करणार्या केसावर फुगे फेम सचिन कुमावत यांनी याला संगीत दिलेले आहे. गायन अण्णा सुरवाडे, निर्माता अभिलाष जोशी ,छायाचित्रण ऋषिकेश चौधरी यांचे असून मुख्य भूमिकेत अभिलाष जोशी आहेत. याची कथा- पटकथा गणेश पाटील यांची असून बाळू वाघ समाधान निकम, राहुल गुजर, दीपक पाटील ,ओम थोरात सोनू थोरात आदी कलाकारांचा समावेश आहे.
लग्नपत्रीका या लघुपटाबाबत निर्माता ऋषिकेश चौधरी म्हणाले की, समाजातील वाईट प्रथांविरुद्ध आम्ही कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला समाजातून प्रतिसाद लाभणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.