भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात दोन दिवशीय रिजनल कल्चरल इंटीग्रेशन मीट २०२३ संपन्न झाले. या सोहळ्यात 3 तारखेला रविवार रोजी सकाळी अतिथींचे स्वागत करण्यात आले यामध्ये सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती मेरी मनी मॅडम, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय नागपूर कुरेशी मॅडम, प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अकोला चंदनशिव व आर आर कासार नवोदय विद्यालय बुलढाणा, जवाहर नवोदय विद्यालय जळगाव विजय अंभोरे इत्यादी उपस्थित होते यांच्या स्वागतानंतर सकाळी नऊ वाजता साहित्यिक क्रियाकलापांना सुरुवात झाली त्यामध्ये सर्वात प्रथम निबंध लेखन स्पर्धेत रायगड, दमन, हिंगोली, अहमदाबाद, गोंदिया येथील जवाहर नवोदय विद्यालयातील पंधरा विद्यार्थी सहभागी झाले नंतर वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली. जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली, दमण, गोंदिया, रायगड, अहमदाबाद येथील आठ विद्यार्थी सहभागी झाले.
याच श्रुंखलेत कविता गायनामध्ये जवाहर नवोदय विद्यालय दमन, हिंगोली, गोंदिया, अहमदाबाद येथील अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांनी मिशन लाईफ एन्व्हायरमेंट, वसुधैव कुटुंबकम इत्यादी विषयावर काव्यगायन केले . या उपरात क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये 16 विद्यार्थी सहभागी झाले. जवाहर नवोदय विद्यालय दमन व हिंगोली या दोन शाळा सहभागी होत्या.
सकाळच्या सत्रातील शेवट सेमिनारने झाला यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय अहमदाबाद, गोंदिया, रायगड येथील एकूण 22 विद्यार्थी सहभागी झाले होते, या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण तज्ञांनी केले. भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयातील श्री. एस. टी. चौधरी, एस.टी. वासकर, एस. पी. पाठक हे तज्ञ परीक्षक म्हणून लाभले .
दुपारच्या दुसऱ्या सत्रात मुख्य अतिथी जिल्हाधिकारी जळगाव श्री.आयुष प्रसाद यांची मोलाची उपस्थिती लाभली. जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत श्रीमती मेरी मनी सहाय्यक आयुक्त नवोदय विद्यालय समिती, पुणे संभाग यांनी केले, ड्रामा रायटर थिएटर भुसावळ हर्षल पाटील, माजी आमदार संजय भाऊ सावकारे इत्यादी मान्यवर अतिथी गणांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमातील या द्वितीय सत्रात समूहगीत, नाटक, समूह नृत्य इत्यादींचा समावेश होता. सदर स्पर्धोचे परीक्षण श्रीकांत जोशी, आनंद सपकाळे, धर्मराज देवकर या तज्ञ परीक्षकांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला. छत्रपती संभाजीनगर येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आमदार संजय सावकारे सोबत सहाय्यक आयुक्त मेरी मणी, प्रिंसीपल विजय अंभोरे, झरीना कुरेशी, आर.कसर, आर.चंदन शिव, डॉ.मनिषा कुळकर्णी, प्रेम कुमार, निशिकांत पाठक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच सहभागी शिक्षकांनाही प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संजय सराठे, बलराम दिवेदी, अजय धारणे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय नागपूर श्रीमती कुरेशी यांनी केले