अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या धुळे रस्तालगत असलेल्या निवासस्थानी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
श्री गणेश मुर्तीची आमदार अनिल पाटील व त्यांच्या अर्धांगिनी जि. प. सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. यावेळी आमदार अनिल पाटील यांचे कुटुंब उपस्थित होते.
त्यांच्या राहत्या घरी गणरायासाठी सजावट करण्यात आली असून गणरायाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापने नंतर सपत्नीक आमदार पाटील यांनी गणरायाची आरती केली.
आमदार पाटील व जयश्री पाटील यांनी बळीराजाला सुख शांती व समृद्धी लाभू दे त्याची भरभराट होऊ दे. अशी श्रींच्या चरणीं प्रार्थना केली. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.