मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी पुढील सहा महिन्यासाठी कोथळी या गावात राहणार असून त्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड नियंत्रण, पाणी परिक्षण, विविध योजना, तसेच महिला बचत गट, इ पीक पाहणी अॅप इ.. प्रकारच्या सर्व माहिती व नवीन तंत्रज्ञान कसे आत्मसात करावे या विविध विषयी माहिती देण्यासाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२०२४ यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. बी. सदार व संबंधित विषयातील विषय विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली नामे घनओम पाटील, प्रथम थोरात, जयेश पाटील, रोशन सोनवणे, अनिकेत शिंदे, कार्तिकेय रेड्डी व अमोगोत जीवन या गावात दाखल झाले असून. ग्रामपंचायत कोथळी व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते. हा उपक्रम गावकऱ्यांच्या उपस्थित पार पडणार आहे.
कृषी दूतांचे कोथळी येथे आगमन
11 months ago
No Comments