जळगाव प्रतिनिधी । शहरातील नुतन मराठा महाविद्यालयासमोरून तरूणाच्या हातातील मोबाईल लांबविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली. पुढील कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिपक वाल्मिक मोरे (वय-२७) रा. गोंडगाव ता. भडगाव हा तरूणी शहरातील भक्ती हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉय म्हणून नोकरीला आहे. २० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दिपक हा नुतन मराठा महाविद्यालय परिसरात असलेले रोझ गार्डनमध्ये बसलेला असतांना दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आले. त्यातील एकाने दिपकच्या हातातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. आराडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघेजण दुचाकी घेवून पसार झाले होते. शहर पोलीस ठाण्यात दिपक मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होतो.
परिसरातील सीसीटीव्हच्या अधारे या गुन्ह्यातील संशयित आरोपी निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोउनि रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, संदीप साळवे, सुनिल दामोदरे, दादाभाऊ पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांचे पथक रवाना केले. संशयित आरोपी अक्षय उर्फ मॉडल मुकेश अटवाल (वय-१९) रा. चौघुले प्लॉट यांला राहत्या घरातून अटक केली. त्याच्यासोबत असलेला अल्पवयीन मुलगा आणि त्याचे ही चोरी केल्याची कबुली दिली. दोघांना पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.