चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथील एका हॉटेलच्या पाठीमागे बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्याच्या जवळील साडेसहा हजार रूपये किंमतीची देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहे.
गोरख उर्फ पप्पू वसंत चौधरी (वय-३३) रा. पातोंडा ता.चाळीसगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पातोंडा गावाजवळील प्रणव हॉटेलच्या मागे बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची विक्री सर्रासपणे होत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.
त्यांच्या पथकातील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, सफौ अनिल जाधव, अनिल देशमुख व अशरोफोद्दीन शेख आदींनी यांनी २९ सप्टेंबर रोजी कारवाई करत संशयित आरोपी गोरख चौधरी याला अटक केली. त्यांच्या ताब्यातील ६ हजार ७३८ रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. महेश महाजन यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अनिल अहिरे करीत आहे.