हाणामारीत गळ्यातील सोनसाखळी लांबविणाऱ्यास अटक

 

जळगाव प्रतिनिधी । दोन गटात झालेल्या हाणमारीत एका गटातील तरुणाने दुसऱ्याच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबवली होती. या प्रकरणी दाखल दरोडा व दंगलीच्या गुन्ह्यातील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहिती अशी की, आकश मुरलीधर सपकाळे (वय-२१, रा.कांचननगर) संशयितासह व त्याच्या आठ-दहा साथीदारांनी २३ जूल २०१९ रोजी रात्री १० वाजता भजेगल्लीतील एका बियर बारसमोर तरुणांशी वाद घातले होते. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला चढवला गेला. या हाणामारीत आकाशने दुसऱ्या एका तरुणास मारहाण करुन त्याच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबवली होती. या प्रकरणी आकाश व त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा केल्यापासून आकाश बेपत्ता होता. दरम्यान, तो शुक्रवारी जळगावात येणार असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस कर्मचारी अविनाश देवरे व नाना तायडे यांनी आकशला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

Protected Content