जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील ‘फुले मार्केट’ येथील जनरल स्टोअर फोडून १ लाख २ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेणाऱ्या संशयित आरोपी शुभम उर्फ बंटी मोहनलाल पुरोहित रा. मारवाडी गल्ली, शिवाजी नगर याला बुधवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी शहर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, विकास प्रकाशलाल मकडिया (वय-३३) रा. गणेश नगर, बाबा हरदासराम मंगल कार्यालयाजवळ, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे शहरातील फुले मार्केटमध्ये ‘दृष्टी जनरल सौंदर्यप्रसाधने’ या नावाचे दुकान आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेल्या ड्राव्हरमधून १ लाख २ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेल्याचा प्रकार महापालिकेचे सफाई कामगार यांना गुरुवार २७ जानेवारी रोजी सकाळी सुमारास दुकान पडल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी उमेश भांडारकर करीत होते. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा ममुराबाद रस्त्यावर फिरत असल्याची गोपनिय माहिती पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे आणि योगेश इंधाटे यांना मिळाली. त्यानुसार बुधवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ममुराबाद येथून पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे १४ हजार रूपये हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, संतोष खवले, राजकुमार चव्हाण, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर यांनी केली. संशयित आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.