जळगाव (प्रतिनिधी) मागील तब्बल १९ वर्षापासून दरोडयाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन भाग ५ गुरन.५२/२००० भादवि.क.३९५,३९७ मधील आरोपी शिवा उर्फ भिवा फुला भिल (वय – ४५ वर्षे, रा.खामखेडा ता.शिरपुर जि.धुळे) हा सन – २००० मध्ये गुन्हा घडल्या पासून फरार होता. १ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी शिवा उर्फ भिवा फुला भिल हा शिरपुर येथे येणार आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पो.हे.कॉ. नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, दादाभाऊ पाटील, विनोद पाटील, अरुण राजपुत, किशोर राठोड, रणजित जाधव, किरण चौधरी, हरीष परदेशी अशांवर आरोपीच्या अटकेची जबाबदारी सोपवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपुर ते खामखेडा दरम्यान आरोपी शिवाचा पाठलाग करुन त्यास पकडले. आरोपी शिवाला गुन्हयांचा पुढील कामकाजा करीता चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.