फैजपुर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला असून आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पक्षाने फैजपूर पोलिसांचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सुदैवाने त्यातून त्या सावधपणे सुखरूप बचावल्या. सार्वजनिक क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या महिला नेत्यावर अशा पद्धतीने होईल हल्ले होत असतील तर ते समाजात जाणून बुजून अशांतता माजविण्याचा प्रयत्नाचा एक भाग आहे असे आम्हाला वाटते. आम्ही या निवेदनाद्वारे सदरील घटनेचा व ती घटना घडविणाऱ्या दोषी आरोपींचा तीव्र निषेध व्यक्त करून आणि संबंधित संशयितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करतो. संबंधित निवेदन सिद्धेश्वर आखेगावकर API फैजपुर पोलिस स्टेशन येथे देण्यात आले.
यावेळी प्रतिभा निळ (ता.अध्यक्षा महिला यावल), ममता आमोदकर(वि.सभा क्षेत्रप्रमुख), निलिमा धांडे(यावल महिला शहराध्यक्ष), नंदा महाजन(ता.उपाध्यक्ष यावल), हेमराज चौधरी डालुशेठ (जिल्हा दूध संघ जळगांव नगरसेवक फैजपुर), अनवर खाटीक(रा.शहराध्यक्ष फैजपुर), संजय रल(नगरसेवक), विनोद कोल्हे vk(रा.युवक शहराध्यक्ष फैजपुर) व निलेश आमोदकर(सामजिक कार्यकर्ते) हे उपस्थित होते.