हद्दपार गुन्हेगाराला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात हद्दपार आरोपींची माहिती घेत असताना दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला विशाल मुरलीधर दाभाडे (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी,जळगाव) हा शहरात फिरत असल्याचे आढळल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपार आरोपींची माहिती घेण्याविषयी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सूचना दिल्या. पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, अतुल वंजारी, पोहेकॉ राजेश मेढे, हरिलाल पाटील, विजय पाटील, विजयसिंग पाटील, अक्रम शेख यांनी विशाल दाभाडे याला सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता याला रामेश्वर कॉलनीतून ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Protected Content