जळगाव प्रतिनिधी । शहरातील यमुना नगर भागातील लिला पार्कजवळ हातात तलवार घेवुन आरडा ओरड करणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली. एमआयडीसी पोलीसात तरूणावर आर्मॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी धनंजय छोटू विसपुते (वय-23) रा. यमुना नगर, लिला पार्क हा हातात तलवार घेवून यमुना नगरात आरडाओरड करत नागरीकांमध्ये दहशत निर्माण करत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.फौ. रामकृष्ण पाटील, पोकॉ शरद भालेराव, गफारखाँ तडवी, रविंद्र घुगे यांनी निवडणूक काळात खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असतांना आरोपी धनंजय विसपुते याला शुक्रवारी रात्री 10.30 वाजता अटक केली असून त्याच्या हातातील 1 हजार रूपये किंमतीची दोन फुट लांब लोखंडी तलवार हस्तगत केली. यापुवी संशयित आरोपी धनंजय विसपुते यांच्यावर भुसावळ शहरात तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश भंग केला आहे. याप्रकरण स.फौ. रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी धनंजय विसपुते यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.