धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात लहान मुलांच्या क्रिकेट खेळतांना झालेल्या किरकोळ वादातून तिघांना शिवीगाळ धारदार चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याबाबत सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात शनिवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गावातील काही मुले क्रिकेट खेळत होते. त्यावेळी या क्रिकेट खेळण्यावरून काही मुलांमध्ये वाद निर्माण झाला. या कारणावरून गजानन देविदास ढमाले, सपना गजानन ढमाले आणि देविदास मडकू ढमाले यांना गावातील काही जणांनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी गजानन ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.




