मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | होळी आणि धुलिवंदन साजरी करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध आज मागे घेण्यात आले आहेत. यामुळे दोन वर्षानंतर यंदा आधीप्रमाणेच उत्साहात होळी साजरी होणार आहे.
होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. त्या संदर्भात नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली होती. मात्र, विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता राज्य सराकारने आपले निर्बंध मागे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. होळी, धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे राज्यभरात यंदा होळी, धुळवड / धुलिवंदन मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 17 मार्च, 2022 रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे पालन करुन साजरा करावा.
18 मार्च 2022 रोजी धुलिवंदन व 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमीत्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असे शासनाने नमूद केले आहे.