रेशन दुकानातील माल काळ्या बाजारात विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड येथील विकास सोसायटीच्या रेशन दुकान क्रमांक 105 व 106 मधून माल चोरून काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धान्य मालाची अफरातफर झाल्याने गेल्या दोन दिवसांपासुन मारवड येथील विकास सोसायटीच्या दुकानातील धान्य यांच्यात काय तफावत आहे याची चौकशी सुरु होती. यात तफावत आढळून आल्याने या दुकानाचा सेल्समन अनिल काशीनाथ पाटील यांनी रात्रीच्या वेळी अँपे रिक्षाचालक यांना बोलावून हमालाच्या मदतीने गाडीत टाकून पळून जाण्याच्या प्रयत्न केला होता मात्र गावातील ग्रामस्थांनी जागीच पकडल्याने रेशन दुकानातील चोरलेला मालासहीत गाडी पोलीस ठाण्यात जमा केली होती. काल ता.27 रोजी दिवसभर दिवसभर चौकशी सुरु होती. आज सुद्धा पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी चौकशी केली असता रेशन दुकानाच्या मालात तफावत आढळल्याने श्री. संतोष बावणे यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड येथील रेशन दुकानाचा सेल्समन अनिल काशीनाथ पाटील, जैतपीर येथील वाहनचालक प्रशांत विजय पाटील, मारवड येथील हमाल दिनेश वडर यांच्या विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी हे तपास करीत आहे.

Protected Content