चोपडा प्रतिनिधी । आपल्या जीवनात आपण भगवान महावीरांनी सांगितल्या तत्वानुसार चाललो तर नक्कीच आपली प्रतिष्ठा वाढेल व आपले जीवन सदगुणांनी सजविले तर तोच आपल्या जीवनाचा खरा श्रुंगार असल्याचे मौलिक विचार बाल ब्रम्हचारी अर्चना दीदी यांनी आपल्या प्रवचनातून दिला.
बाल ब्रह्मचारी अर्चना दिदी या येथील जैन तारण तरण समाजाचे पर्युषण पर्व निमित्त तारण तरण भवनात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, गुणांचा आचरण करणे म्हणजेच धर्म होय आजचा युवक सुख नाही मागत तर वस्तू रूपी मागत असतो. देवाकडे मागताना गाडी, बंगला, सोने, पैसा, आदी मागत असतो. परंतु सुख मागितले तर हे सर्व मिळेल असे ही त्यांनी आपल्या प्रवचणातून सांगितले. यावेळी जैन तारण तरण समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते. अध्यक्ष संजय जैन व उपाध्यक्ष सुभाषचंद जैन आलेल्या मान्यवराचे स्वागत केले यावेळी महेंद्र जैन यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.