जळगाव, प्रतिनिधी । शहरात विविध भागांमध्ये मोठे पीवीसी पोल उभारले जात आहेत. रिलायन्स महानेट कम्पनी हे काम करत असून रस्ते किंवा स्थानिक रहिवाशांच्या अडचणींचा काहीच विचार न करता केंद्र सरकारकडूनच तशी परवानगी असल्याचे सांगत ही कम्पनी मनमानी करत असल्याची तक्रार शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी केली आहे .
महापालिका अधिकारी यांना विचारणा केली असता समजले की, हे रिलांयन्स महानेट चे काम सुरु असून कंपनी कडून कायमस्वरूपी मोठे पीवीसी पोल उभारले जात आहेत.. कंपनीला स्थानिक पातळीवर परवानगी घेण्याची गरज नसून तसे परिपत्रक मोदी सरकार चे असल्याचे प्रशासनातर्फे सांगितले गेले. असे परिपत्रक असेल तरि देखील स्थानिक पातळीवर महापालीका प्रशाशनने काळजी घेणे गरजेचे आहे.कारण कंपनीकडून पोल उभारले जात असताना लोकांच्या दारा लगत , खाजगी रिकाम्या प्लाट समोर वाटेल तसे उभारले जात आहेत
ते भविष्यात नवीन बांधकाम करताना अडचणीचे ठरणार आहे. महापालिकेच्या ओपन स्पेसलाही बाधा पोहचेल..महापालिकेकडून अमृत योजना असेल अथवा इतर भूमिगत पाइप लाइन असतील याबाबत कंपनीने माहिती घेतली आहे का?महापालिकेने कंपनीसोबत चर्चा . केली आहे का? त्यांच्या कामावर महापालीका देखरेख ठेवत आहे का? भविष्यात महापालिका असेल अथवा खाजगी काम करताना अडचणी येऊ नये या प्रकारेच काम होणे अपेक्षित आहे.
महापालिकेच्या होणाऱ्या नुकसानीचा प्रश्नदेखील अनुत्तरित आहे. केंद्र सरकारची परवानगी असली तरि महापालिकेने खबरदारी घेऊन कंपनीला काम करायला लावणे गरजेचे आहे असेही नगरसेवक अनंत जोशी यांनी सांगितले