शहर विकासासाठी ४२ कोटींच्या कामांना मंजुरी : आ. राजुमामा भोळे (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 01 at 8.12.20 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहराच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी पैकी ४२ कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी उर्वरित कामांना मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आ. राजुमामा भोळे यांनी सांगितले. याप्रसंगी महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनावणे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, गट नेते भगत बालाणी आदी उपस्थित होते.

 

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ना. गिरीश महाजन यांनी १०० कोटींचा निधी आणून वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागारोत्थान अभियानांतर्गत महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पातील ४२ कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. विकास कामांतून तसेच भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित निधीसाठी प्रस्ताव पाठवत आहोत आणि त्यास १५ ते २० दिवसात मंजुरी येऊन त्या कामांचा देखील कार्यादेश निघेल असेही आ. भोळे यांनी पुढे सांगितले. निधीबाबतचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलाला आहे. जळगाव शहराला पावणे आठशे कोटींचा निधी मिळाला आहे. काही कामांची सुरुवात झालेली आहेत तर काही कामे लवकर सुरु होतील. केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणून जळगाव शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही आ. भोळे यांनी सांगितले. तसेच हुडकोच्या कर्जासंदर्भात ना. गिरीश महाजन व आ. भोळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली असून लवकरच हा मार्गी लावण्यात येईल असे मत व्यक्त केले.

Protected Content