Home अर्थ पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी

पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी

0
34

मुंबई । राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तब्बल साडे अकरा हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

 


Protected Content

Play sound