भुसावळ प्रतिनिधी । गेल्या तीन दिवसांपासून जागेच्या प्रलंबित मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरु होते. अखेर आज (दि.19) या प्रलंबित मागणीस मंजूरी देण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शेतकरी भूषण चौधरी रा.जळगाव, कुंदन पाटील आणि इतर सात शेतकऱ्यांनी गेल्या एक वर्षापासून नगरपालिका प्रशासनाकडे आपल्या मालकीचे गट क्रमांक 304/1, 299/3, 301/1, 306/4, या जागेच्या बिनशेती प्रस्तावाची फाईल मंजुरीसाठी सादर केली. मात्र नगरपालिकेने एक वर्षापासून फिरवाफिरव करत हे प्रकरण प्रलंबित ठेवल्याने शेतकरी भूषण चौधरी यांनी दि.30 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर शहर पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थाने आत्मदहनाचा इशारा मागे घेण्यात आला होता. मुख्याधिकारी यांच्याशी सलग दोन हप्ते चर्चा मसलत करून देखील प्रशासनाकडून काहीही हालचाली न दिसल्याने शेतकऱ्यांनी दि.12 सप्टेंबर रोजी भुसावळ नगरपालिका कार्यालयाबाहेर सलग दोन दिवस उपोषण केले. तर यावेळी काही नगरसेवकांच्या मध्यस्थाने लेखी आश्वासनाच्या संदर्भीय पत्रावरुन उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी मागितलेल्या तीन दिवसाच्या अवघी नंतर सुद्धा प्रशासकीय कारणे देत फाईलचे काम मार्गी न लागल्याने अखेर शेवटचा अंतिम पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या आशेवर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर दि.16 सप्टेंबरपासून ठिय्या मांडून आमरण उपोषण सुरुवात केली आणि आज दि.19 सप्टेंबर रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे व नगरसेवक मुकेश पाटील यांच्या प्रयत्नाने या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे.
यावेळी मुख्याधिकारी सोमनाथ कोठुले आणि आदी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले. यात शेतकरी भूषण चौधरी यांच्या प्रस्तावास पूर्ण मंजुरी मिळाली असून कुंदन पाटील यांच्या तीन पैकीच्या दोन फाईला मंजुरी मिळाली. तर एक प्रकरणाच्या फाईल अंतिम मंजुरी मिळाले नाही. मात्र ती फाईलला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अन्यथा पुन्हा उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागेल, असे शेतकरी बांधवांनी यावेळी सांगितली आहे.