पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कमेला मंजूरी; अमोल शिंदे यांची माहिती

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी काढलेल्या पिक विम्याची रकमेला मंजूरी मिळाली आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याला सुरूवात झाली आहे. अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली आहे.

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका या पिकांचा पिक विमा काढला होता. परंतु नुकसान भरपाई बाबत फार मोठी ओरड मतदार संघात निर्माण झाली होती. याबाबत मार्गदर्शक सूचनेनुसार उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई जे पीक कापणी प्रयोगाच्या संकलनानुसार निश्चित केले जातात याकरिता पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदाजे १०५ कोटी रुपये पेक्षा जास्त ची रक्कम मंजूर झालेली असून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात ते नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
यामध्ये पाचोरा तालुक्यातील ४६११६ शेतकऱ्यांना ९३ कोटी ५८ लाख व भडगाव तालुक्यातील २३७७१ शेतकऱ्यांना ११ कोटी ८४ अशी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे.यापुढे देखील शेतकऱ्यांसोबत वेळोवेळी उपस्थित राहणारे पीक विम्याचे प्रश्न बाबत पाठपुरावा करुन हक्काची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत राहणार आहे असे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेला पत्रकात सांगितले.

Protected Content