मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने रावेर लोकसभा अंतर्गत बोदवड, रावेर व यावल तालुक्यातील विविध रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा 3) अंतर्गत २२ किमी लांबीच्या ४ रस्ते कामासाठी २० कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती ना. खडसेंचे स्वीय्य सहाय्यक तुषार राणे यांनी दिली.
या कामांमध्ये यावल तालुकांतर्गत कासारखेडा – किनगांव – चुंचाळे – दहीगांव – कोरपावली ते प्रजिमा १८ (लांबी ८.३४ किमी) रु. ८३४ लक्ष, कोळवद – सांगवी बु. – बोरखेडा – हिंगोणा ते विटवा रस्ता (लांबी ३.१५ किमी) रु. २७५ लक्ष, बोदवड तालुकांतर्गत साळशिंगी ते जलचक्र बु. ते प्रजिमा ४७ रस्ता (लांबी ५.५० किमी) रु. ४७२ लक्ष व रावेर तालुकांतर्गत केऱ्हाळे – कर्जोद – निरूळ ते जिल्हा हद्द रस्ता (लांबी ४.५२ किमी) रु. ४०७ लक्ष असे या २२ किमी लांबीच्या ४ रस्ते कामासाठी २० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून, यामुळे सदर परिसरातील नागरिकांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे आभार मानले आहे.