मुंबई (वृत्तसंस्था) माजी महसुल आणि कृषी मंत्री आ. एकनाथराव खडसे हे मंत्रीपदी असताना त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी विविध शैक्षणिक, संशोधन संस्था, महाविद्यालये व अन्य विकासकामे मंजूर केली होती, परंतु त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे सर्व प्रकल्प थंडबस्त्यात पडले होते. ते पूर्णत्वास नेण्यासाठी खडसे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा सुरू होता.
जिल्ह्यातील या विविध प्रकल्पांना निधी मंजूरी आणि इतर प्रशासकीय बाबी मंजूरीसाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस माजीमंत्री खडसे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव कृषी रोहयो एकनाथ डवले, आ. संजय सावकारे, व इतर संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत खालील विकास कामे ,प्रकल्प मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.
1) जिल्हातील जलसंपदा व जलसंधारण विभागाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी बैठक आयोजित करणे…
2) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरीचे विभाजन करुन उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करणे…
3) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत जळगांव जिल्ह्यामध्ये शासकीय दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणे…
4) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत भुसावळ, जि. जळगांव येथे शासकीय मत्स्य महाविद्यालय सुरु करण्यासाठी आर्थिक तरतुद करणे…
5) पोलिस प्रशिक्षण केंद्र, वरणगांव, ता. भुसावळसाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करणे…
6) हिंगोणा, ता. यावल येथे महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी अंतर्गत केळीचे टिश्यु कल्चर रोपे तयार करण्याच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पीय तरतुद करणे…
7) पाल, ता. रावेल, येथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय सुरु करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुद करणे…
8) सालबर्डी, ता. मुक्ताईनगर, येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी अर्थसंकल्पीय तरतुद करणे…
9) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे विभाजन करुन दोन नवीन कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत प्राप्त झालेल्या डॉ. वेंकटेश्वरलू समितीच्या अहवालावर कार्यवाही करणे…
10) महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पूर्णा नदीच्या पात्रातून जलशुध्दीकरण केंद्रासह पाणीपुरवठा योजनेसाठी नवनिर्मित मुक्ताईनगर नगरपंचायतीकरीता निधी उपलब्ध करुन देणे…
11) महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी नवनिर्मित बोदवड नगरपंचायतीकरीता निधी उपलब्ध करुन देणे…
12) जिल्ह्यातील मक्ताईनगर, बोदवड व भुसावळ नगरपरिषदेस नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर करणे…
13) सावदा नगरपरिषद, जि. जळगांव- नगर परिषद हद्दवाढ मंजूर करणे…
14) संत मुक्ताई मंदिर, कोथळी, ता. मुक्ताईनगर, या तिर्थक्षेत्राच्या विकास आराखडयातील कामे अधीक्षक अभियंता, सा.बां. मंडळ, जळगांव यांच्यामार्फत करणे…
15) जिल्ह्यासाठी मंजूर असलेले पशुवैद्यकीय महाविद्यालय, सालबर्डी, ता. मुक्ताईनगर, येथे लोकहितास्तव सुरु करणे…
16) उद्यानविद्या महाविद्यालय, पाल, ता. रावेर, येथे कार्यान्वीत करणे…
17) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा क्र. 2 मध्ये मुक्ताईनगर मतदार संघातील गावे समाविष्ट करणे…
18) मुक्ताईनगर, बोदवड व अमळनेर तालुके दुष्काळसदृश्य घोषित करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देणे…
19) मुक्ताईनगर व बोदवड नगरपांचायतीस वैशिष्टपुर्ण कामांसाठी निधी मंजूर करणे…
20) महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नवनिर्मित बोदवड नगरपंचायतीसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करणे…
21) शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात सुरु करण्याबाबत विधीमंडळात दिलेल्या आश्वासनुसार विभागास निर्देश देणे…
22) शासकीय तंत्रनिकेतन (अल्पसंख्यांक) मुक्ताईनगर, शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून सुरु करण्यासाठी निधी मंजूर करणे…
23) जळगांव महानगरपालिकेसाठी पुर्णवेळ आयुक्त नियुक्त करणे…
24) मुक्ताईनगर नगरपंचायतीस पुर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करणे…
25) महानंद, मुंबई येथे महाव्यवस्थापक (वित्त) या पदावर उपसंचालक (लेखा व कोषागारे) यांची तातडीने नियुक्ती करणे…
26) सावदा ग्रामिण रुग्णालय कार्यान्वीत करण्यासाठी पदनिर्मितीचा व इमारत बांधकामाच्या प्रस्तावास मंजूरी देणे…
27) कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेस जास्तीचा निधी मंजूर करणे…