Home उद्योग जळगावात ‘आप्रेन्टिसशीप’ मेळावा, बेरोजगारांना मिळणार दिलासा !

जळगावात ‘आप्रेन्टिसशीप’ मेळावा, बेरोजगारांना मिळणार दिलासा !

0
204


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत (PM National Apprenticeship) एका भव्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे होणार आहे.

शिक्षणानुसार मिळणार संधी
या भरती मेळाव्यात विविध पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. यामध्ये शिल्पकारागीर योजनेंतर्गत विविध व्यवसायातील प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या तसेच दहावी, बारावी, डिप्लोमा आणि डिग्रीधारक प्रशिक्षणार्थींना सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

नामांकित कंपन्यांची उपस्थिती
या भरती मेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. यामुळे उमेदवारांना थेट शिकाऊ उमेदवारी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा मेळावा गरजू तरुणांसाठी एक उत्तम संधी असून, त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.

उमेदवारांना आवाहन
आयोजकांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशिक्षणार्थी आणि उमेदवारांना या भरती मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही संधी रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound