रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात स्वच्छ भारत अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे आल्याने चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहे.
रावेर पंचायत समितीतर्फे राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेच्या दप्तर तपासणीत अनेक गैरव्यवहारात अनेकांचा समावेश असल्याची शक्यता पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांना बारा हजार रुपये अनुदान दिले जाते. अनुदान देताना पडताळणी व शौचालय बांधकाम केल्याची खात्री केल्यावरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम टाकण्यात येते. मात्र या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी बीडीओ यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी २२ फेब्रुवारीला त्रीसदस्यीय समिती नेमून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला दिले होते.