लोकसभेतील पक्षाच्या उपनेतेपदी गौरव गोगोईंची नियुक्ती

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची लोकसभेतील पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून आठ वेळचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच खासदार मणिकम टागोर आणि डॉ. एम. डी. जावेद यांना व्हीप नियुक्त करण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले की, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना पत्र लिहून लोकसभेत काँग्रेस पक्षासाठी उपनेते, मुख्य व्हीप आणि दोन व्हीप यांच्या नियुक्तीबद्दल माहिती दिली आहे. याआधी पक्षाने राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे इतर पक्ष लोकसभेत लोकांचे प्रश्न पूर्ण शक्तीने मांडतील.

 

Protected Content