विधानसभा निवडणूकीसाठी मतदार संघनिहाय सर्वसाधारण निरीक्षक नियुक्त

election

 

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने विधानसभा महारष्ट्रातील सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

 

विधानसभा मतदार संघनिहाय सर्वसाधारण निवडणूक निरिक्षकांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक अनुक्रमे असे आहेत. 10-चोपडा व 11-रावेरसाठी श्री. नरेंद्रसिंग पटेल, भ्रमणध्वनी-9149496045/ 9423761579, 12-भूसावळ व 13-जळगाव शहरसाठी श्री. रुपक मुजूमदार, भ्रमणध्वनी-7086056499/ 9423701478, 14-जळगाव ग्रामीण व 15-अमळनेर श्री. पुनीत गोयल, भ्रमणध्वनी-9888100321/ 9423694304, 16-एरंडोल व 17-चाळीसगावसाठी श्री. पार्थ सारथी मिश्रा, भ्रमणध्वनी-9777456777/ 9423720873 आणि 18-पाचोरा, 19-जामनेर व 20-मुक्ताईनगरसाठी श्री. गौरव बोथरा, भ्रमणध्वनी-8638758844/9423716372 असे आहेत.  मतदारांना निवडणूकी संदर्भात काही तक्रार, सुचना अथवा अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक निरीक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

Protected Content