भुसावळ प्रतिनिधी । वांजोळा येथील मूक-बधीर बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली आहे.
भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील पाच वर्षाच्या मूक-बधीर बालिकेवर तिच्याच चुलत काकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत कुर्हा-वराडसीम जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सौ. पल्लवी सावकारे म्हणाल्या की, भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील एका नराधमांने बलात्कार केल्याची घटना घृणास्पद आहे. महिलांवर अत्याचारांच्या घटना वाढत आहेत.सरकारने महिला सुरक्षतेबाबत कठोर नियम लागू करणे अनिवार्य आहे असे त्या म्हणाल्या.
महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असतील तर सरकारने आरोपीना कठोर शासन करून करून तत्काळ निर्णय घेऊन भर चौकात फाशीवर लटविण्यात यावे.जेणे करून अशी घटना करण्याचा प्रयत्न करणार्याच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. यासाठी हा खटला जलदगती कोर्टात चालवून यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी देखील सौ. सावकारे यांनी याप्रसंगी केली.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस अधिकारी महिती देण्यास टाळाटाळ करतात.हे अत्यंत चुकीचे असून झालेल्या घटनेची माहिती ही पोलिसांनी तत्काळ प्रसार माध्यमांना देणे हे जी.प.सदस्य सौ.पल्लवीताई सावकारे यांचे वैयक्तिक मत त्यांनी पत्रकारासमोर मांडले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2808622946054876