डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

madarsa

 

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील ज्या मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयाचे शिक्षण देण्यात येते. तसेच ज्यांना आधुनिक शिक्षणाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदानाची आवश्यकता आहे. अशा मदरसांसाठी शासनामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे.

सन 2019-20 या आर्थिक वर्षात ज्या मदरसांना अनुदान आवश्यक आहे. अशा मदरसांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी मदरसा/मदरसे चालविणा-या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील इच्छूक मदरसांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्रतापराव पाटील, सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Add Comment

Protected Content