जळगाव (प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2019-2020 या आर्थिक वर्षाकरीता बीजभांडवल योजना व अनुदान योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी उद्दीष्ट प्राप्त झालेली आहे.
जिल्ह्यातील मातंग समाजातील होतकरु, गरजवंत, व्यावसायिक पुरुष/ महिला लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ मिळण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधून कर्ज योजना तसेच अनुदान योजनांचे फार्म विनामुल्य घेवून जावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.