Home Cities अमळनेर अमळनेरात अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” साजरा करण्याचे आवाहन

अमळनेरात अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” साजरा करण्याचे आवाहन

0
49


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार व राजे संभाजी मित्र परिवार यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” साजरा करण्याच्या उद्देशाने विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान अब्बासिया मस्जिद, वसई देवी मंदिर, सिंधी हाऊसिंग सोसायटी मधील गुरुद्वारा मंदिर, जैन मंदीर, बोहरी समाज, पांचाळ वस्ती, शिवाजी बगीचा महादेव मंदिर, संतोषी माता मंदिर, महाराणा प्रताप मित्र मंडळ आदि ठिकाणी संबंधित ट्रस्ट प्रतिनिधी, प्रमुखांना प्रतिनिधीक स्वरूपात राष्ट्रध्वज भेट देण्यात आला. प्रसंगी पंकजभाऊ चौधरी, युवा नेते आरिफ भाया, तथा राजे संभाजी मित्र परिवार, शिवशक्ती मित्र परिवार तथा आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound