कृषी योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाडीबीटी फार्मर  पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जा|द्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.  सन 2021-22 करिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  सन  2020-21 मध्ये महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करणारे परंतू कोणत्याही योजनेसाठी  निवड न झालेले  शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतील. असे अर्ज सन 2021-22 करिता ग्राह्य धरले जातील त्याकरिता त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही. 

शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावरील  ‘ शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा.  शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट किंवा सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.  ‘वैयक्तिक लाभार्थी’   म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेता येईल. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected]  या ई- मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे संचालक, विस्तार व प्रशिक्षण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका कळविले आहे.

 

Protected Content