Home Cities अमळनेर महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत अपूर्व सुभेदार राज्यात दहावा

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत अपूर्व सुभेदार राज्यात दहावा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ऍड. ललीता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याने महाराष्ट्र प्रज्ञा शोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

 

अमळनेरातील ड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थि चि.अपूर्व अजय सुभेदार याने महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रतून दहावा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा आई वडिलांसह संस्थेच्या अध्यक्षा ललिताताई पाटिल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 

यावेळी संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटिल, संचालक पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, आदी उपस्थित होते. दरम्यान, अपूर्व सुभेदार याच्या या उज्वल यशाबद्दल त्याचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound