Home Cities एरंडोल एरंडोल येथे म्हसावद रस्त्यांवर अॅपे रिक्षा उलटली ; एक ठार चार जखमी

एरंडोल येथे म्हसावद रस्त्यांवर अॅपे रिक्षा उलटली ; एक ठार चार जखमी


एरंडोल (प्रतिनिधी) म्हसावद कडे जात असलेली अॅपे रिक्षाच्या पुढील चाकात अचानक डुक्कर आल्यामुळे रिक्षा पलटी होऊन बाबुराव मोहन हटकर (पाटील) राहणार पिंप्राळा वय ६५ वर्ष हे जागीच ठार झाले असून अन्य तीन जन जखमी झाले आहे. सदर दुर्गटना म्हसावद रस्त्यातील सरस्वती कॉलनी जवळ बुधवार ३ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजेच सुमारास घडली आहे.

 

एरंडोल येथून अॅपे रिक्षा क्रमांक -एम एच १९ वी १२६७ चार प्रवासी घेऊन म्हसावदकडे जात असतांना सकाडी साडे नऊ वाजेच सुमारास सरस्वती कॉलनीजवळ अचानक अॅपे रिक्षाच्या पुढील चाकात डुक्कर आल्यामुळे दुर्घटना घडली. या घटनेत बाबुराव मोहन हटकर (पाटील) हे जागीच ठार झाले तर रहीम शहा, रहेमान शहा (रा. म्हसावद वय ४९ वर्ष) , वैशाली जेठलानी (वय ४७ रा. प्रोपेसर कॉलनी अमळनेर) ,सखाराम बारेला (वय ४५ वर्ष रा. शासकीय विश्रामगृह जवळ एरंडोल) ,सिपरू शहा (वय ३१ वर्ष रा. म्हसावद) हे किरकोळ जखमी झाले आहेत. याघटनेबाबत रहीम शहा, रहेमान शहा यांनी फिर्याद दिल्या वरून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ए.एस.आय. अशोक मोरे हे करीत आहे. दरम्यान अपघातातील जखमी वर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound