जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रचलित अभ्यासक्रमाच्या ATKT च्या नियमाचा फायदा होत नाही. अशा विद्यार्थ्यांना Any 23 असा नियम लागू करण्यात यावा, अशी मागणी अभाविपने आंदोलनाद्वारे केली होती. त्यानुसार अखेर 8 ऑगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासने निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालय गेल्या तीन वर्षांपासून टप्याटप्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्न होत आहे. तसेच अन्य संलग्नित महाविद्यालयात 80-20 हा पॅटर्न बंद होत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रचलित अभ्यासक्रमाच्या ATKT च्या नियमाचा फायदा होत नाही. त्या विद्यार्थ्यांना Any 23 असा नियम लागू करण्यात यावा, अशी मागणी अभाविपने 17 जुलै 2019 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात घंटानाद आंदोलन करून कुलगुरू श्री पी.पी. पाटील यांच्याकडे केली होती.
या संदर्भात अभाविपचे शिष्टमंडळ 10 जुलै पासून वेळोवेळी कुलगुरू महोदयांना भेटले होते, अखेर 8 ऑगस्ट रोजी विद्यापीठ प्रशासने निर्णय घेतला. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय वर्ष मिळून तृतीय वर्षाला जाण्यासाठी 15 व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष मिळून चतुर्थ वर्षाला जाण्यासाठी त्यांना Any 23 हा नियम लागू केलेला आहे. तरी या निर्णयाने विद्यापीठातील 950 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्य वाचणार आहे. या निर्णयामुळे अभाविपने कुलगुरू महोदय व विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले व सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवल्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन केले. अभाविपच्या शिष्टमंडळात रितेश चौधरी, विराज भामरे, हर्षल तांबट, योगेश पाटील, पवन भोई, कल्पेश पाटील, अजय पाटील, शिवानी पाटील, वैभव मानकर , अश्विनी पाटील, दीपक चव्हाण, शुभम राठोड, कल्पेश चिनावले, श्रुती शर्मा, किरण साळवे, तेजश्री पाटील यांचा समावेश होता.