मनपास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत अनुभूती स्कूलने मारली बाजी

WhatsApp Image 2019 08 21 at 8.53.40 AM

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा हौशी कॅरम संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी तसेच जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने जळगाव शहर महानगरपालिका १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या आंतरशालेय कॅरम स्पर्धा जैन इरिगेशनच्या कांताई सभागृह येथे दिनांक २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी जैन स्पोर्टस अकॅडमीचे मुख्य क्रीडा समन्वयक फारुक शेख, मनपाचे क्रीडाअधिकारी एम. एम. पाटील, हौशी कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष शरीफ खान व सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ८० मुले व मुलींनी सहभाग नोंदविला. त्यातून विभागस्तरीयसाठी दोन्ही गटातून खालील प्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात आली.

 

निवड झालेले खेळाडू मुले :.देवेंद्र दीपक शिर्के (अनुभूती इंग्लिश स्कूल ), नाईस अहमद (एम.ए.आर.अँग्लो उर्दू) , अमन हारून पिंजारी (अनुभूती इंग्लिश स्कुल) , शेख मोहम्मद बिलाल ( मिल्लत हायस्कूल) , प्रथमेश श्याम वाघ (अनुभूती इंग्लिश स्कूल). खान अदनान युनुस (मिल्लत हायस्कूल) , मोहम्मद उमर नईमुद्दीन (मिल्लत हायस्कूल) , अर्षद मोहम्मद रईस बागवान(एम. ए. आर.अँग्लो उर्दू हायस्कूल).

निवड झालेल्या मुली : रेणुका अनिल मोरे (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), प्रणाली संतोष भालेराव (अनुभूती इंग्लिश स्कूल),रीना अरुण मगरे (अनुभूती इंग्लिश स्कूल), मारिया मुर्तुझा एरंडोलवाला (सेंट लॉरेन्स हायस्कूल), कोमल रमेश पवार (अनुभूती इंग्लिश स्कूल), निकिता गौतम सोनवणे (अनुभूती इंग्लिश स्कूल)
, उम्मेहानी अताऊल्लाह खान (ईकरा शाहीन हायस्कूल),धारणा चौधरी (सेंट लॉरेन्स हायस्कूल). प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात सर्व विजयी स्पर्धकांना स्पोर्ट्स हाऊस जळगावचे आमीर शेख तर्फे मेडल देण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. याप्रसंगी  शिक्षक भाग्यश्री भंगाळे. सय्यद मुख्तार, शहबाज शेख ,रवींद्र पाटील, संजय पाटील, आताऊल्ला खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सय्यद मोहसीन, मोहम्मद फजल, वसीम शेख, मोहम्मद जुबेर तसेच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयशा खोकावाला इत्यादींनी परिश्रम घेतले.

Protected Content