यावल प्रतिनिधी । शहरात सलग दुसरा दिवशी कोरोना संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या ५९ जणांची ॲन्टीजन तपासणी करण्यात आली असून या तपासणीत एक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तथापि, २२ जणांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी तसेच नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी हे शहरातील परिस्थितीवर नजर ठेवुन होते .आज दिनांक १६ एप्रिल रोजी पोलीसांनी शहरातील विविध वर्दळीच्या परिसरात कुठलेही कारण नसता फिरणाऱ्या ५९ रिकामटेक्यांची ॲन्टीजन तपासणी यावल ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ नानासाहेब घोडके व त्यांच्या आरोग्य कर्मचारी यांच्या पथकाने केली असुन यात एक व्याक्ती ही पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त मिळाले असुन , पोलीसांनी व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीत एकुण २२जणांवर मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे या संचारबंदीचे नियम मोडल्यावरून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.