विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अॅन्टीजेन चाचणी (व्हिडिओ)

जळगाव, राहूल शिरसाळे  । कोरोना काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे  करण्यात आले आहे.मात्र, काही नागरिक याकडे सर्रास  दुर्लक्ष करून विनाकारण बाहेर पडत आहेत. अशा नागरिकांची टाॅवर चौकात अॅन्टीजेन  चाचणी करण्यात येत आहे.   

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली. यात अत्यावश्यक सेवा वगळता सेवा बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले.मात्र,याला न जुमानता काही नागरिक घरा बाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर वचक बसावा यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.  टाॅवर चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची सायंकाळी ५ वाजेपासून सक्तीने  अॅन्टीजेन चाचणी करण्यात येत होती.   अॅन्टीजेन चाचणीसाठी नागरिकांना एक रांगेत उभे करण्यात आलेले आहे. ज्यांची चाचणी झाली आहे अशा नागरिकांना दहा ते पंधरा मनिटे थांबवून हातोहात रिपोर्ट देण्यात येत आहे. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/387757842501856

 

Protected Content