किनगावात डेंग्यू विरोधी मोहिमेस प्रारंभ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनीधी | तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  माध्यमातून गावात डेंग्यू विरोधी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

किनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन  व तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत उपकेंद्र किनगाव बुद्रुक,किनगाव खुर्द व डांभुर्णी येथे अति संवेदनशील भागात डेंगू विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

या मोहीमेव्दारे गावात डेंगू ताप रुग्ण सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण ,हस्त पत्रिका वाटणेसह गाव पातळीवर डेंगू तापाची लक्षणे, उपचार,डेंगू ताप प्रतिरोधक उपाययोजनाबद्दल माहिती ग्रामीण पातळीवरील नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे,खिडक्यांना जाड्या बसवणे,शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बसवणे घरासमोर पाणी साचू न देणे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे तसेच रात्री झोपताना मच्छरदाणी लावून झोपणे याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

 

या मोहीमेतआरोग्य सहाय्यक आर. आर. सुरवाडे,आरोग्य सेवक जे. के. सोनवणे,डी.एम.बरडे,पी.जी. काळे, एम.बी.बारेला किनगाव बुद्रुक येथील आशा वर्कर निराशा जाधव, रेखा पाटील,आशा भालेराव, दिपीका पाटील,धनश्री वाघुळदे सुनिता पाटील,मीना साळुंखे किनगाव खुर्द येथीलआशावर्कर जयमाला अडकमोल, दुर्गा तायडे,सायरा तडवी डांभुर्णी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सोनल भंगाळे आशा वर्कर छाया कोळी,रेखा कोळी,सायरा तडवी,पुनम सनेर व ममता कोळी यांचे सहकार्य लाभत आहे.

Protected Content