राज्य सरकारचा आणखी एक निर्णय; लवकरच उत्सवात दाखल गुन्हे घेणार मागे !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आणखी एक निर्णय घेतला असून त्यानुसार गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचे स्वरुप पाहून गुन्हे लवकरच मागे घेण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून गुन्ह्यांचे स्वरूप पाहून गुन्हा मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या गुन्ह्यांचे स्वरूप तपासण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेली समिती याबाबत निर्णय घेणार आहे.

ज्यांनी लाखांपेक्षा कमी रकमेचं नुकसान केलं असेल अशा खटल्यांबाबत ही समिती निर्णय घेणार असून ३१ मार्च २०२२ पूर्वी दोषारोपपत्र दाखल झालेल्या खटल्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. त्यानुसार गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचा शासन आदेश सरकारकडून जारी करण्यात आला आला आहे. 

Protected Content