

अमळनेर (प्रतिनिधी) पाणी हेच जीवन आहे, यासाठी अनोरे तालुका अमळनेर येथील पाणी फाऊंडेशन स्पर्धेतील नागरिकांचा उत्साह पाहून अमळनेर तालुक्याचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सामाजिक भावनेने ५० हजार रुपयाची तात्काळ मदत जाहीर केली. यामुळे अनोरे विकास मंचच्या पदाधिकारी यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

यावेळी माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील आणि नगरध्यक्षा पुष्पलता पाटील यानी पन्नास हजाराची भरीव मदत करून आपल्या संपुर्ण टिमसह श्रमदानाला येणार आहेत. त्यामुळे अनोरेकरांचा ऊत्साह वाढला आहे. अनोरे ग्रामस्थांनी माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे अनोरे विकास मंचाच्या पदाधिकारी यांनीमनापासुन आभार व्यक्त केले.


