Home क्राईम अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

0
38

dead ..........

जळगाव प्रतिनिधी | जिल्हापेठ पोलिस हद्दीतील विक्रांत मेडिकलच्या समोर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास एक 35 ते 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीतील विक्रांत मेडिकल समोर व परिसरात 31 ते 40 वर्षीय व्यक्ती गेल्या 2 दिवसांपासून फिरत होता. अशी माहिती स्थानिक दुकानदारांनी जिल्हापेठ पोलिसांनी दिली आहे. (दि.17 जून) सोमवारी रोजी त्या व्यक्तीचा सकाळी 7 वाजेच्या सुमारास विक्रम मेडिकलच्या अंगणात मयत स्थितीत आढळून आला. त्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जिल्हापेठ पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांनी ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलिसांनी केले आहे. जिल्हापेठ पोलिसात या घटनेबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच पुढील तपास मेहेर करीत आहे.


Protected Content

Play sound