जळगाव (प्रतिनिधी) काही मुलांना दूध आवडत नाही, काहींना डॉक्टरांनी ते पिण्यास मनाई केलेली असते.अशावेळी त्यांना हेल्दी दूध कसे देता येईल ? याचाच विचार करीत शेफ हर्षाली चौधरी यांनी ‘फन कोकोनट मस्ती’ नावाचा अनोखा मिल्कशेक तयार केला आहे. हा मिल्कशेक मुलांसाठी खूप चांगला, १००% नॅचरल व आरोग्यास उपयुक्त आहे. मुलांना ज्या गोष्टी आवडत नाहीत पण त्यांच्या शरीरासाठी त्या गरजेच्या आहेत. त्या मूलांना मिळव्या, यासाठी शेफ हर्षाली चौधरी यांनी वेगळ्या पद्धतीने मिल्कशेक तयार करून मुलांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे.
लागणारे साहित्य । नारळाचे दूध, बर्फाचे तुकडे, शुगर सिरप, ऑरेंज इमल्शन, पायनापल इमल्शन व मॅंगो इमल्शन.
अशाचप्रकारे अन्य पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी ‘लाइव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमित भेट देत रहा.