कांग नदीतील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

jamner news 1

 

जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या हिवरखेडा रस्त्यावरील कांग नदीपात्रात बुधवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहुन आल्याची खळबळजनक घटना उडकीस आली होती. त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून तालुक्यातील देऊळगाव येथील ईश्वर ममराज राठोड (वय-३६) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, मयत ईश्वर राठोड हा मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा तरूण सासरवाडी अंबिलहोळ येथील आहे. पत्नी आणि मुल माहेरी असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी अंबिलहोळ येथे जात होता. परंतु रात्री उशीर झाल्यामुळे तो पायीच भुसावळ रस्त्याने निघाला असावा. त्यानंतर त्याचा मृतदेहच १७ तारखेला वाहुन आला होता. मृत ईश्वर हा सासरवाडी अंबिलहोळ येथे असेल असे त्याच्या कुटुंबीयांना वाटले तर तो घरी देऊळगांवला असेल असे सासुरवाडीतील लोकांना वाटले. या घटनेबाबत जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृतदेहाची ओळख न पटल्यामुळे आणि मृतदेह पाण्याने फुगलेला असल्याने आज मृतदेहावर जामनेर पोलीसांनी विधीवत अंत्यसंस्कार केले होते. मात्र आज वर्तमानपत्रामुळे त्याची ओळख पटली. मयताच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परीवार आहे.

Protected Content