यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये १४ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या स्नेहसंमेलनाचे आर्कषण ठरले ते अयोध्या येथे झालेल्या भगवान श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्री राम माता सीता राजा दशरथ, लक्ष्मण, भरत शत्रुघ्न, माता शबरी इत्यादीसह रामायणातील विविध पात्राच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून यावेळी जणू काही रामायणच सुरू आहे असे प्रेक्षकांना वाटत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत पाटील, उपाध्यक्षा शैलेजाताई पाटील, नेल्सन इंडिया कंपनीचे सिनीयर व्यवस्थापक आकाश वाघमारे, बालाजी डेव्हलपर्सचे संचालक मनिष पाटील, प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उपप्राचार्य राजश्री अहिरराव, पो.पा.संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील होते. या कार्यक्रमात सीता स्वयंवर, माता शबरी, श्रावण बाळ, रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांचा हुबेहुब देखावा यावेळी विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केला. तर महर्षी वाल्मिक ऋषी, रामसेतू, द्रोणागिरी पर्वत, हनुमान प्रतिमा, अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिकृती, श्री राम धनुष्य इत्यादीचे जिवंत देखावे विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः तयार करून वार्षिक स्नेहसंमेलनाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक हर्षल मोरे, योगीता बिहारी, देवयानी साळुंखे, मिलींद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाल चित्ते, पवनकुमार महाजन, सुहास भालेराव, सोनाली कासार, प्रतिभा पाटील, बळीराम कोतवाय, शेखर पाटील, वैशाली चौधरी, योगीता सावडे, रोहित बावीस्कर, दिलीप संगेले, मयुरी बारी, सोनाली वाणी, रत्ना बाविस्कर, वैशाली बडगुजर, अतुल साळुंखे, वैशाली मराठे, बाळासाहेब पाटील इत्यादींसह वाहनचालक व कर्मचारी उपस्थित होते.