भडगाव येथे गिरणाकाळ शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सभा

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव येथे आज १३ ऑगस्ट मंगळवारी रोजी श्री गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी लि भडगावची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मान्यवराच्या हस्ते भगवान बलरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष विनोद बोरसे यांनी प्रास्तविक व कंपनीचा लेखा जोखा भविष्यातील वाटचाली संदर्भात मांडणी केली. आत्माचे अमोल सोनवणे यांनी शासकीय योजनेबद्दल मार्गदर्शन केले. सा.फु संस्थेचे संभाजीनगरचे प्रमुख कैलास राठोड यांनी केंद्र शासन व नाबार्ड एफ पी ओ स्थापने मागील उद्देश सांगितला.

सभेचे अध्यक्ष अमित तायडे नाबार्ड यांनी अध्यक्षीय भाषणात केंद्र व नाबार्ड यांच्या माध्यमातुन अल्पभुधारक शेतकारी संघटीत करून उत्पादित शेतमाल एकत्रित प्रक्रीया करून मुल्यवर्धन करणे तसेच एन सी डी एक्स ऑन लाईन कमोडीटी मार्केट ओ एन डी सी ऑनलाईन प्लॅटफॉर्म नाबार्डच्या माध्यमाने कंपनीशी संलग्न करून दिले भविष्यात परिसरातील उत्पादीत शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारणे फळ पिक निर्माती साठी पॅक हाऊसची निर्मिती करणे कापुस प्रक्रिया उद्योग उभारणे. याबाबत उपस्थित भागधारकांशी चर्चा व मार्गदर्शन केले.

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड, अमित तायडे, सन्मवयक अमोल सोनवणे सा.फु. संस्थेचे संभाजीनगर प्रमुख कैलास राठोड, बालाप्रसाद जेठलिया, शिवम शिरतुरे, अध्यक्ष विनोद बोरसे, सचिव सुनिल पाटील, खजिनदार कविता पाटील, संचालिका कल्पना पाटील, संचालक निवृत्ती निकम, गणेश बोरसे, अतुल पाटील, धनंजय देसले व परिसरातील पिचर्डे बात्सर पिपंरखेड सावदे, गिरड, अजंन, विहीरे, आमडदे, पळासखेडे येथील २०० भागधारक शेतकरी उपस्थित होते मिडीया प्रतिनिधी धनराज पाटील याचे वेळोवेळी शेती शाळा व कंपनीच्या उपक्रामाची प्रसिद्धी दिल्या बद्दल सा.फु सस्थंचे कैलास राठोड यांनी आभार व्यक्त केले सभेच्या समारोप करताना सचिव सुनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Protected Content