जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । केसीईची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव ॲड.प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले,व्यवस्थापन सदस्य भालचंद्र पाटील , भरत अमळकर ,डॉ. हर्षवर्धन जावळे ,डॉ.शिल्पा बेंडाळे, प्रा.अशोक राणे, श्रीकांत मनियार, प्राध्यापक संजय भारंबे, प्रा.अनिल राव, रुपेश चिरमाडे, संजय प्रभुदेसाई हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला सुरुवातीला खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी दिवंगत सदस्यांना अभिवादन करण्यात आले . चंद्रयान तीन मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा अभिनंदनचा ठराव यावेळी करण्यात आला. तसेच विशेष सत्कार संस्थेच्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक असे वस्तीगृह बांधून त्यास मातोश्री श्रीमती गोदावरी किसन राणे असे नाव देण्याकरिता संस्थेस डोनेशन दिल्याबद्दल वसंत राणे आणि उर्मिला राणे या पती-पत्नींचा सत्कार यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच साहेबराव भुकन यांच्या विनोबा आणि शिक्षण या ग्रंथासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गद्य लेखन कर्मवीर भाऊराव पाटील राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संस्थेतील विविध शाखा मधील प्राचार्य, प्राध्यापक कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. यात प्राचार्य संजय भारंबे,विद्यापीठ पाटील, प्रा.केतन नारखेडे,डॉ. भूपेंद्र केसुर, डॉ. मनोज पांडे ,डॉ.वसीम आर शेख, डॉ. चंद्रमणी लभाणे, प्रा. सुरेखा पालवे,डॉ.कैलास खडसे,डॉ.जयवंत मगर,प्रा.जयप्रकाश चौधरी,डॉ. मनोजकुमार चोपडा, डॉ.भुषण कविमंडन,प्रा.जयश्री महाजन,प्रा.योगेश बोरसे,डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ.व्ही.एस.कंची,डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.रजनी सिन्हा,अनंत महाजन व सोनल महाजन, अमोल देशमुख, स्वामी पाटील, डॉ.धनश्री चौधरी,सुभाष तळेले,वसंत गवई, विजय जावळे,दत्तात्रय कापरे , स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे जयंत इंगळे,अतुल इंगळे , आय एम आर येथील डॉ.शिल्पा बेंडाळे, तनुजा फेगडे ,मुरलीधर वायकोळे, वर्षा झनके, योगेश चौधरी ,स्वप्निल काटे ,निशांत घुगे,पराग नारखेडे,निलिमा पाटील, शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, डॉ. शैलजा भंगाळे, डॉ. केतन चौधरी, डॉ. कुंदा बाविस्कर, डॉ. रंजना सोनवणे, डॉ. निलेश जोशी, ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुषमा कंची, अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर चे प्रा.संजय पावडे,डॉ.योगेश खडके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, सचिव प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी पुढील पाच वर्षातील व्हिजन सर्वांसमोर मांडले यात केसीई सोसायटीच्या विविध मान्यता प्राप्त शाखा यांच्यात समन्वय घडवून विद्यार्थी हितासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम राबवून तसेच नॉलेज बेस, स्किल बेस्ट एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार असल्याचे भाकीत केले आणि लवकरच क्लस्टर विद्यापीठ आपण होवू असे सुतवाच केले यासोबतच आगामी काळात आर्किटेक कॉलेज डी फार्म बी फार्म महाविद्यालय सुरू करण्याचा मानस यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲड. प्रमोद पाटील यांनी मानले.