अहमदनगर वृत्तसंस्था । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून (दि.20) आपल्या राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरामध्ये मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा लवकर व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन व्रत सुरू केले आहे.
निर्भया प्रकरण, हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या यासर महिलांवरी वाढत्या गुन्हेगारी घटनांविषयी अण्णांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ९ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हे सूचिक केले होते की ते २० डिसेंबरपासून मौन व्रत ठेवतील. अण्णा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे असे म्हटले आहे की ‘मी निर्भया प्रकरणी त्वरित न्याय मिळण्याच्या मागणीसाठी मौन व्रत सुरू करत आहे आणि जर न्याय मिळत नसेल तर मी बेमुदत उपोषण करीन.’ असे ही त्यांनी सांगितले आहे.