राळेगणसिद्धी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलन करणार होते. मात्र ग्रामसभेत अण्णांनी उपोषण करू नये असा ठराव मंजूर करण्यात आल्याने त्यानी सोमवारी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
राळेगणसिद्धी येथे आज संपन्न झालेल्या ग्रामसभेत ‘वयाचा विचार करून उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. त्याला मां देत अण्णांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत समाजसेवक अण्णा हजारे यांनी या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले होते.
या निर्णयाविरोधात अण्णा हजारे आज सोमवार, दि.१४ जानेवारी रोजी आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र शनिवार, दि.१२ फेब्रुवारी रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेऊन यावर तीन तास चर्चा केली. त्यावर आपलं ५० टक्के समाधान मत व्यक्त करत अण्णा हजारे यांनी उपोषणासंबंधी रविवारी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होत. अण्णांनी उपोषण करू नये असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. त्यामुळे अण्णांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.